पाळलेल्या कुत्र्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- पाळलेला कुत्रा घरासमोर येऊन घाण करतो. या कारणावरुन दोन कुटूंबात लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने हाणामारी झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे दिनांक ३ सप्टेंबर रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रवी सिताराम कांबळे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ३ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान रवी कांबळे हे त्यांच्या घरासमोर असतांना तेथे आरोपी आले. आणि म्हणाले की, तुमचा कुत्रा बांधत जा. तो आमच्या घरासमोर येवुन घाण करतो.

असे म्हणुन शिवीगाळ करु लागले. त्यावेळी रवी कांबळे त्यांना म्हणाले की, येथुन पुढे माझा पाळलेला कुत्रा तुमच्या घरापुढे येणार नाही. असे समजावुन सांगत असतांना त्यांना त्याचा राग आल्याने त्यांनी रवी कांबळे यांना लाथा बुक्क्यांने व लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले.

त्यावेळी रवी कांबळे यांची पत्नी शितल व मुलगी आरती अशोक गिरी असे भांडणे सोडविण्यासाठी आले. तेव्हा त्यांना देखील मारहाण केली. तसेच त्यांच्या इंडीका गाडीची काच फोडुन नुकसान केले. तु जर परत आमचे नादी लागला तर तुला पाच पंचवीस पोर आणुन तुझा काटाच काढुन टाकु. अशी धमकी दिली आहे. रवी सिताराम कांबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनिल भारत निकम, अर्जुन जग्गु निकम, भारत निकम सर्व राहणार आरडगाव ता. राहुरी.

यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार गायकवाड हे करीत आहेत. सुनिल भारत निकम राहणार आरडगांव ता. राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ३ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजे दरम्यान सुनिल निकम हे त्यांच्या घरासमोर असतांना तेथे आरोपी आला व म्हणाला की, तु माझ्या कुत्र्याबद्दल का बोलतो. असे म्हणुन शिवीगाळ करु लागला.

त्यावेळी सुनिल निकम हे त्यास समजावुन सांगत असतांनाचा त्याला राग आल्याने त्याने सुनिल निकम यांना लाथा बुक्क्यांने व लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. त्यावेळी सुनिल निकम यांचे वडील भारत व बहिण सुवर्णा हे भांडणे सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली.

तु जर परत माझे नादी लागला तर तुझा कोयत्याने मुडदाच पाडुन टाकीन. अशी धमकी दिली आहे. सुनिल निकम यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवी सिताराम कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डि.के आव्हाड हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe