file photo

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- मुलगी झाली म्हणून नाराज झालेल्या पतीने दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजार रूपयांची मागणी केली. त्यासाठी विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना २०१५ ते २०१८ दरम्यान राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे.

जयश्री संदिप रन्नवरे वय २५ वर्षे राहणार कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी तालूका राहुरी. या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, फेब्रुवारी २०१५ पासुन ते सप्टेंबर २०१८ रोजी दरम्यान जयश्री रन्नवरे ही तिच्या सासरी नांदत असताना यातील आरोपी हे तिला नेहमी म्हणत की, तु आम्हाला आवडत नाही.

तु तुझे आई वडील यांचेकडुन जागा घेण्यासाठी तसेच दुबईला जाण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेवुन ये. या कारणावरुन आरोपींनी जयश्री रन्नवरे हिला नेहमी लाथा बुक्कानी मारहाण करुन शिवीगाळ केली.

तसेच उपाशी पोटी ठेवुन घराचे बाहेर हकलुन दिले. तिचा शारीरीक व मासनिक छळ करुन तु जर तुझे आई वडीलांकडुन पैसे घेवुन आली नाहीतर तुला जीवंत सोडणार नाही. असा दम दिला आहे. या सर्व प्रकरणाला कंटाळून जयश्री रन्नवरे हिने राहुरी पोलिसात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसां समक्ष कथन केला.

तिच्या फिर्यादीवरून आरोपी पती संदीप गोरख रन्नवरे तसेच सासु शोभा गोरख रन्नवरे दोघे राहणार कराळेवाडी राहुरी फँक्टरी ता. राहुरी. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.