भाजपासोबत आम्ही गेलो याचा अर्थ आम्ही निळा झेंडा खाली ठेवलेला नाही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शूटिंग बंद पाडू, असे वक्तव्य करणारे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची गुंडागर्दी महाराष्ट्रात चालू देणार नाही. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात रविवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपासोबत आम्ही गेलो याचा अर्थ आम्ही निळा झेंडा खाली ठेवलेला नाही. त्यामुळे ज्या शिवसैनिकांना जयभीम बोलण्यास अडचण वाटत होती, ते शिवसैनिक आज जयभीम बोलू लागले.

आपल्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर आपले बरे-वाईट होईल, अशी काही लोकांची अपेक्षा होती. मात्र, आपल्या पाठीमागे भीमशक्ती व जयभीमचा बुलंद आवाज आहे. ज्यांनी माझे वाईट होईल असा विचार केला, उलट त्यांचेच वाईट झाले, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe