अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता राज्य सरकारने वैद्यकीय सेवा-, मेडिकल, पेट्रोल पंप व इतर अत्यावश्यक बाबी वगळता शनिवार आणि रविवार दोन दिवस संपूर्ण शहरातील दुकाने बंद असल्यामुळे कर्जतसह राशीनमध्ये व तालुक्यात शासनाच्या नियमाचे पालन करीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी काही काळ नगर पंचायतचे कर्मचारी कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते तर ते पोलिसांनी ही तालुक्यात विविध ठिकाणी लक्ष ठेवले.
रस्त्यावर मास्क न लावता फिरणाऱ्यावर तसेच विनाकारण फिरणाऱ्या वर ग्रामपंचायत राशिनच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे सर्व नागरिकांनी शासनाच्या दिलेल्या नियमाचे पालन करीत व मास्क, सॅनिटायझर,
चा वापर करावा सोशल डिस्टन्स चे नियम पाळावेत याशिवाय शनिवार रविवार जाहीर केले करण्यात आलेली संचारबंदीचे पालन करावे, घरातच रहावे, विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन पोलिसांच्या वतिने करण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|