अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-दिवसेंदिवस राज्यभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे प्रशासन या वाढत्या कोरोचा विळखा सोडवण्यासाठी अहोरात्र महेनत करतांना दिसत आहे.
तर दुसरीकडे काहीजण केवळ पैसे कामावन्याच्या नादात नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
अन शहरातील एका नामाकिंत हॉस्पिटलचे डॉक्टर हे स्वतः कोरोना बाधित असतांना त्यांनी आपले रुग्णालय बंद न-ठेवता सर्रासपणे रुग्णांची तपासणी करत पैसे कमविण्याचा चक्क बाजारच मांडला होता.
परंतु याबाबतची माहिती प्रशासनाला मिळताच तत्काळ कोपरगावचे तहसिलदार व वैद्यकीय अधिक्षक यांनी हॉस्पिटला भेट देत सदर हॉस्पिटल तत्काळ सील करत कारवाई केली.
परंतु सदरच्या डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारे कारवाई होऊ नये यासाठी शहरातील अनेक राजकिय नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते हे प्रयत्न करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
या कोरोना कालावधीत प्रशासनाने सर्वानाच नियम एकसारखेच दिलेले असतांना देखील उच्चभ्रू सोसायटीतील डॉक्टरानी सर्व नियम धाब्यावर बसविले असतांना
सामान्य नागरिकांनी थोडे जरी नियम मोडले तरी त्यांचा कडून प्रशासनाच्या वतीने दंड वसुली जोरात सुरू असते परंतु या मोठ्या लोकांवर कारवाई होणार का? हा प्रश्न उपस्थित होते आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|