अहमदनगरकरांना ज्याची भीती होती तेच झाल ! जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी …

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-  सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्णवाढ कायम असून कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. 

गेल्या चार दिवसात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम असून आजही तब्बल 1228 रुग्ण वाढले आहेत. तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे 

त्यात नगर शहरात ३५४ रुग्णांचा समावेश आहे. अहमदनगर शहर ३५४, राहाता १२६ , संगमनेर ८४, श्रीरामपूर ७९, नगर तालुका ३७, पाथर्डी ३९, अकाेले ३९, काेपरगाव ८९, राहुरी ८२, कर्जत ५९, नेवासा ५२,

पारनेर ३५, भिंगार शहर २९, शेवगाव २२, जामखेड ४७, श्रीगाेंदे ३३, आणि इतर जिल्ह्यातील २२ जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

जिल्हा रुग्णालयानुसार २५७, खाजगी प्रयाेगशाळेनुसार ५९९, आणि रॅपिड चाचणीमध्ये ३७२ जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

सर्वाधिक रुग्णवाढ नोंद :- कोरोनाचा एक पीक येऊन गेल्यानंतर भारतात पुन्हा संसर्ग वेगाने वाढतो आहे. गतवर्षी कोरोनाचे नवे रुग्ण ८ हजारांवरून ६२ हजार होण्यासाठी ६८ दिवस लागले हाेते.

यंदा मात्र ४६ दिवसांतच हा पल्ला गाठला. मार्चमध्ये कोरोनाचे रग्ण सर्वात वेगाने वाढले.

१६ मार्चला देशात २४,४९२ रुग्ण होते. २४ मार्चपर्यंत ते ४७,२६२ आणि २६ मार्चला ५९,११८ झाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, गेल्या २४ तासांत ६२,२५८ नवे रुग्ण आढळले.

हा यंदाचा उच्चांक आहे. गतवर्षी इतके रुग्ण १६ ऑक्टोबरला आढळले होते.

सध्या महाराष्ट्र-पंजाबमुळे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी ३६,९०२ रुग्ण आढळले. पंजाबमध्ये ३,१२२ आणि छत्तीसगडमध्ये २,६६५ रुग्ण आढळले होते

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe