जे व्हायला नको होत तेच झाले… अखेर अहमदनगर मध्ये कडक लॉकडाऊन !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- नगर शहरामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे

त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कोरोना चा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे.

उद्या रात्री बारा वाजल्यापासून ते 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे यामध्ये आरोग्य सुविधा सोडून फक्त दूध सकळी 7 ते 11 पर्यत विक्री चालू तसेच किराणा विक्री व भाजीपाला विक्री बंद राहणार आहे.

शेतकऱ्यांनी नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीत आणू नये अन्यथा मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहराचे आमदार संग्राम जगताप महापालिका आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे,

पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे तसेच कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी मार्केट यार्ड महात्मा फुले चौक येथे पाहणी केली.

पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांनी यावेळी सांगितले की नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये कोणीही जॉगिंग साठी बाहेर पडू नये विनाकारण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यानी सांगितले. 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe