अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात साकत येथे सासरी नांदत असलेली विवाहित तरुणी सो. रेशमा शिवप्रसाद पाटील, वय २९ वर्ष हिने तिचा नवरा शिवप्रसाद चंद्रकांत पाटील याचे कोणत्या तरी बाईशी असलेल्या संबंधावरून पत्नी रेश्मा हिने नवरा शिवप्रसाद याला विचारले की, ती बाई कोण? या कारणावरुन आरोपी नवरा शिवप्रसाद पाटील याने वेळोवेळी पत्नी रेशमा हिचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला त्रास दिला.
नवरा व सासरच्या लोकांनी तू माहेरहून प्लॉट घेण्यासाठी २ लाख रुपये घेवुन ये ते पेसे आणत नाही. म्हणून छळ केला.
या त्रासातून रेशमा शिवप्रसाद पाटील या विवाहित तरुणीने आत्महत्या करून आपला जीव दिला. मयत रेश्मा हिचा भाऊ ज्ञानेश्वर हनुमंत चव्हाण,
धंदा शेती, रा. सावरगाव, ता. जामखेड याने जामखेड पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी नवरा शिवप्रसाद चंद्रकांत पाटील, सासरा, चंद्रकांत सर्जेरात पाटील,
सासू कल्पनाबाई चंद्रकांत पाटील, उमेश चंद्रकांत पाटील राणी उमेश पाटील सर्व रा. साकत, ता. जामखेड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी नवरा शिवप्रसाद पाटील याला अटक केली आहे. पोनि गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखातली पोसई थोरात हे पुढील तपास करीत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|