अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- जेऊर बायजाबाई शिवारातील जागेच्या वादातून महिलेला शिवीग करत विनयभंग केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एक महिलेने फिर्याद दिली आहे.
ही घटना 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे. या सदर्भात पोलिसांनी दिनकर शंकर पाटोळे, फ्रन्सी दिनकर पाटोळे , नितीन पाटोळे, पुष्पा पाटोळे, सुनिता पाटोळ,
जया पोटाळे, सिमा पाटोळे, यांच्या विरोधात हा गुन्हा करण्यात आला आहे. फिर्यादी याची बायजाबाई जेऊर परिसरात वडीलोपराजित शेती आहे.
फिर्यादी व त्याची आई या जेऊर परिसरात शेती पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी यांनी फिर्याद यांना शिविगाळ केली. आमच्या शेतीत यायचे नाही असे म्हणत शिविगाळ, दमदाटीकरत विनयभंग केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
व तुम्हाला आम्ही शेती देणार नाही असे म्हणून मला व माझ्या आईला घाण घाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन फ्रान्सिस पाटोळे याने माझ्या छातीला धरून लज्जा उत्पन्न येईल असे वर्तन केले या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण्यात आला आहे
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम