नेवाश्यातील यात्रा उत्सव यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणारा यात्रा उत्सव यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.

याबाबतचा निर्णय विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आषाढी वद्य कामिका एकादशीला दरवर्षी येथे लाखो भाविक पैस खांब दर्शनासाठी येतात.

मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या बैठकीचे आयोजन शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील सभागृहात करण्यात आले होते.

यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख, विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. माधवराव दरंदले, अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वास गडाख,

ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ जगताप, भिकाजी जंगले, पोलीस निरीक्षक विजय करे, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप आदींसह अनेकजण उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News