तुम्ही खूप छान दिसता असे म्हणत महिला अधिकाऱ्याचा केला विनयभंग

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. याबाबत महिला अधिकाऱ्याने शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली शेवगाव) असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

संबंधित महिला अधिकाऱ्याने फिर्यादीत म्हंटले आहे की, विशाल हा फोन करून कार्यालयात चकरा मारून ओळख वाढविण्याचा प्रयत्न करीत होता. अवैध व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मदत करून व त्यातून येणारे पैसे पोहोच करू असे लाचेचे आमिष दाखवीत असे.

तसेच माझ्याजवळ मन हलके करीत जा, तुम्ही छान ड्रेस घालता. त्यामुळे तुम्ही छान व फ्रेश दिसता असे म्हणत माझा विनयभंग केल्याचा प्रयत्न केला. तसेच कौटुंबिक बदनामी करण्यात आली. माझ्या पतीलाही मेसेज पाठवून त्रास दिला असे फिर्यादीत म्हंटले आहे.

याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या फिर्यादीवरून विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाड गल्ली शेवगाव) असे या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून शेवगावमधील हा इसम आणि तहसील प्रकरण जिल्ह्यात गाजू लागले आहे. यामुळे आता विशाल बलदवा यावर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News