अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- सलग पाच ते सहा दिवसांपासून सोनईत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरू आहे. मंंगळवारी (८ जून)रात्री महावीर पेठेतील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एका युवकास गंभीर जखमी केले.
उद्योजक विजय चांडक यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरटे घरात घुसणार इतक्यात चांडक यांचा मुलगा कृष्णा यास जाग आली. तो दरवाजा जवळ येताच चोरटे घराबाहेर पडले.
एका चोरट्याचा हात धरला असता अन्य चोरट्यांनी कृष्णाच्या तोंडावर दगड फेकून मारला. यात त्याचे चार दात तूटून आठ टाके पडले. आवाज ऐकून माजी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुगळे घराबाहेर आले.
त्यांनी प्रसंगावधान राखत बंदुकीतून हवेत गोळीबार केला. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर चोरट्यांचा शोध घेतला. पण चोरटे सापडले नाहीत.
बुधवारी सरपंच धनंजय वाघ,राजेंद्र गुगळे, पत्रकार विनायक दरंदले, सचिन पवार यांनी सहायक निरीक्षक रामचंद्र कर्पे यांची भेट घेतली.
बंद सीसीटीव्ही यंत्रणेस ४० हजार खर्च असल्याचे पोलिसांनी सांगताच गुगळे यांनी २० हजार तर सरपंच वाघ यांनी २० हजारांची मदत देत जाहीर केले. रात्रीची गस्त सुरु करण्यात आली आहे, असे कर्पे यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम