Mangal Uday 2024 : धनु राशीत मंगळाचा उदय, ‘या’ 5 राशींना होणार मोठा फायदा !

Published on -

Mangal Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचाली सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करतात. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम राशींसह पृथ्वीवरही होतो. अशातच ग्रहांचा राजा मंगळ या महिन्यात आपली चाल बदलणार आहे, ज्याचा फायदा पाच राशीच्या लोकांना होणार आहे.

16 जानेवारी रोजी ग्रहांचा सेनापती मंगळाचा धनु राशीत उदय होईल. मंगळ भूमी, धैर्य, शौर्य, शक्ती आणि उर्जेचे प्रतीक मानला जातो. मंगळवारी रात्री 11:07 वाजता मंगळाचा उदय होईल. ज्याचा फायदा अनेक राशींवर होईल. या काळात धैर्य आणि शक्ती वाढेल. करिअरमध्ये फायदा होईल. आरोग्याशी संबंधित चांगली बातमी मिळेल. तसेच अनेक फायदे मिळतील.

मंगळाच्या चाल बदलाचा ‘या’ राशींना होईल फायदा !

सिंह

धनु राशीतील मंगळाचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीतून लाभ होईल. नवीन घर आणि वाहन खरेदीची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. यश मिळेल. पदोन्नती मिळू शकते. आरोग्यही चांगले राहील. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.

तूळ

तूळ राशीच्या लोकांना मंगळाच्या उदयाचा फायदा होईल. व्यवसायात लाभ होईल. शेअर बाजार किंवा योजनांमध्ये गुंतवणूक करून फायदा होऊ शकतो. भावंड आणि मित्रांशी संबंध चांगले राहतील. आर्थिक लाभ होईल. करिअरमध्येही फायदा होईल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. लव्ह लाईफ देखील चांगली राहील.

धनु

धनु राशीच्या लोकांनाही मंगळाच्या उदयाचा फायदा होईल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. प्रवासाचे बेत आखता येतील. पैशांची बचत होईल. तब्येत सुधारेल.

मेष

या राशीच्या लोकांनाही मंगळाच्या उदयाचा फायदा होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरीत नवीन संधी उपलब्ध होतील. धार्मिक व अध्यात्मिक कार्याकडे कल वाढेल. व्यावसायिकांना फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कुंभ

या राशीच्या लोकांवर मंगळ सुद्धा दयाळू राहील. प्रवासात लाभ होईल. पदोन्नती होऊ शकते. उत्पन्न वाढेल. पैशांची बचत होईल. आरोग्याचाही फायदा होईल. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असाल. भावंडांशी संबंध दृढ होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe