Ferfar In Marathi :- जमिनीच्या संदर्भातली जेवढी ही कागदपत्रे आहेत तेवढे कागदपत्रे ही खूप महत्त्वाचे असून या कागदपत्रांमध्ये सातबारा उतारा तसेच आठ चा उतारा व फेरफार नोंदी यांना अनन्य साधारण महत्व आहे.
जमिनीवरती मालकी हक्काचे पुरावे म्हणून आपण या कागदपत्रांकडे पाहतो. आता शासनाने ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले असल्यामुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे.

यामध्ये जर आपण फेरफार नोंदींचा विचार केला तर ही प्रक्रिया खूप महत्त्वाची असून शेतजमीन व्यवहाराच्या बाबतीत फेरफार नोंदींना खूप महत्त्व आहे. तसेच दुसरे म्हणजे फेरफार नोंदणी मध्ये काही चूक झाली असेल तर जमिनीच्या व्यवहारांमध्ये खूप मोठ्या समस्या निर्माण होतात.
या अनुषंगाने आपण या लेखात फेरफार म्हणजे नेमके काय आणि फेरफार रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे व ऑनलाईन फेरफार कसा काढतात याबद्दलची माहिती घेणार आहोत.
अगोदर पाहू फेरफार म्हणजे काय?
फेरफार म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार अभिलेखात झालेले बदल होय. या जमीन अधिकार अभिलेखांमध्ये जे काही बदल झालेले असतात त्या सर्व बदलांची नोंद फेरफारात केली जाते.
हा एक कायदेशीर नमुना असून जो गाव नमुना क्रमांक सहा तसेच नोंदीचा उतारा म्हणून देखील ओळखला जातो. गाव नमुना क्रमांक सहा चे अ,ब,क,ड असे चार प्रकार पडतात. या फेरफार नमुन्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री तसेच वारसदार हक्क व शेत जमिनीवरील बोजा लावल्याच्या नोंदी ठेवलेल्या असतात किंवा ठेवल्या जातात. सातबारा उताऱ्याचा फेरफार हा एक महत्त्वाचा भाग असून सातबारावरील नोंदी या फेरफार प्रमाणित असतात.
फेरफार रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे?
फेरफार रद्द करायचा असेल तर त्याचा अधिकार प्रांताधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांना असतो. याकरिता तलाठी व तहसीलदारांच्या माध्यमातून अर्जाचा संपूर्ण अहवाल मागवला जातो व सर्व बाजूंनी तुम्ही सादर केलेल्या अर्जाची पडताळणी होते व त्यानंतर जुने फेरफार रद्द करून त्या ठिकाणी नवे फेरफार नोंदवले जातात.
समजा फेरफारत काही चूक झाली असेल किंवा काही दुरुस्ती करायची असेल व तुम्ही ती वेळीच केली नाही किंवा त्यामध्ये वेळीच बदल केला गेला नसेल किंवा एखादी चूक बराच काळ लोटल्यानंतर तुमच्या लक्षात आली असल्यास तुम्हाला उशीर माफीचा अर्ज सादर करावा लागतो. तुम्हाला वेळ का लागला किंवा तुम्हाला विलंब का झाला याचे कारण अर्जात नमूद करणे गरजेचे असते. यासाठी सादर केलेले पुरावे योग्य व सत्य असणे गरजेचे आहे तरच तुमचा अर्ज विचारात घेऊन प्रांताधिकारी तुमची विलंब माफी मंजूर करतात.
तुमच्या गावाच्या फेरफार नोंदी तुम्ही ऑनलाईन कशा पाहू शकता?
1- तुम्हाला जर फेरफार ऑनलाईन पाहिजे असेल तर त्याकरिता तुम्हाला सर्वात अगोदर गुगल वर जाऊन bhulekh.mahabhumi.gov.in असे सर्च करायचे आहे.
2- हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारची महसूल विभागाची वेबसाईट ओपन होते व या वेबसाईटवर उजव्या कडील बाजूला तुम्हाला आपली चावडी नावाचा एक पर्याय दिसतो.
3- या पर्यावर क्लिक केल्यास तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होते.
4- या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावातील फेरफार नोंदी पाहू शकता.
5- त्याकरिता तुम्हाला तुमच्या जिल्हा तसेच, तालुक्याच्या कॉलम समोर तालुका आणि गावाच्या कॉलम समोर तुम्हाला तुमच्या गाव निवडायचे आहे.
6- या ठिकाणी संपूर्ण विचारलेली माहिती योग्य रीतीने भरून झाली की आपली चावडी पहा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे व तुमच्यासमोर त्या गावातील सर्व फेरफारच्या नोंदी ओपन होतील.
7- या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फेरफार नंबर सुरुवातीला दिलेला असतो. त्यानंतर फेरफाराचा प्रकार म्हणजे शेत जमिनीवर बोजा चढवला किंवा कमी केला आहे का? वारस नोंद केली आहे का किंवा जमीन खरेदी केली आहे काय? प्रमाणे प्रकार नोंदवलेला असतो व त्यापुढे फेरफाराचा दिनांक तसेच हरकत नोंदवण्याचे शेवटची तारीख आणि ज्या सर्वे किंवा गट क्रमांक असे संबंधित जमिनीचा व्यवहार झाला आहे तो सर्वे किंवा गट क्रमांक याची माहिती संपूर्णपणे दिलेली असते.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील सगळ्या फेरफार नोंदी पाहू शकता.
आपली चावडी उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या मिळतात या डिजिटल सुविधा
आपली चावडी उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या आता डिजिटल सुविधा मिळतात व या तीन सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही नोटीस पहा या कॉलम मध्ये नागरिक फेरफाराची नोटीस पाहू शकतात.
त्यानंतर दुसरी सुविधा म्हणजे फेरफाराच्या स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीस वर कुणी हरकत घेतली आहे का? हरकत कशामुळे घेतली गेली आहे किंवा तिचा तपशील काय आहे हे संपूर्ण माहिती दिलेली असते. हरकतीकरिता पंधरा दिवसांचा अवधी दिला जातो व या कालावधीत कुणी हरकत घेतली नसेल तर फेरफरावरील नोंद प्रमाणित केली जाते व ती सातबारावर नोंदवली जाते.
त्यासोबतच तिसरा पर्याय म्हणजे मोजणीची नोटीस हा होय. यामध्ये तुमच्या गावांमध्ये जर कोणी जमिनीची मोजणी आणली आहे याविषयीचे संपूर्ण माहिती दिलेली असते. या कॉलम मध्ये तुम्हाला मोजणीचा प्रकार तसेच रजिस्ट्रेशन क्रमांक तालुका आणि गावाचे नाव,
ज्या गट क्रमांक वर मोजणी करायची आहे तो गट क्रमांक तसेच मोजणीचा दिनांक आणि मोजणीस येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक देखील त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो.