अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात जिरदार पाऊस झाला असल्याने सर्वत्र नदी, नाले, तलाव भरभरून वाहत आहे.यामुळे अनेकांना पोहण्याचा मोह आवरत नाही.
मात्र असाच मोह कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शेततळ्यात पोहायला गेलेला १३ वर्षीय मुलाचा पोहायला येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

राहुल रामदास जवक असे या मुलाचे नाव आहे. तर त्याचा चुलत भाऊ बचावला असून त्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
राहुल बुडत असताना त्यास वाचविण्यासाठी गेलेला त्याचा चुलत भाऊ ऋतिक सतिश जवक याने मदतीसाठी आरडाओरडा केली. त्याला वाचविण्यासाठी स्वत: शेततळ्यातच उडी मारली.
परंतु त्याला राहुलने मिठी मारल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, आजुबाजूच्या लोकांनी त्या दोघा भावांना बाहेर काढले. यात राहुल मात्र गतप्राण झाला.
दुसरा भाऊ ऋतिक यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. राहुल हा सहावीच्या वर्गात शिकत होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved