अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील मंदिरे अद्यापही बंद आहे. जगभर ख्याती असलेले जिल्ह्यातील शिर्डी येथील साईमंदिरास कोरोनाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून साईबाबांचे मंदिर बंद असल्याने मंदिरातील दानपेट्या रिकाम्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यांत तब्बल 183 कोटींच्या उत्पन्नाला साईसंस्थानला मुकावे लागले आहे.
सहा हजार कर्मचाऱ्यांच्या हाताला द्यायला काम नाही. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना दरमहा 12 कोटी रुपये पगार द्यावा लागत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांनी सांगितले.
राज्य सरकारने मंदिर सुरू करण्यास परवानगी दिली, तर कोविडसोबत कसा मुकाबला करणार, कोविड रुग्णालय वेळेत का सुरू होत नाही? तसेच उत्पन्न बंद असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवणे आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.
173 कंत्राटी कामगार कोविड रुग्णालयात जोखमीची कामे करतात. त्यांची 40 टक्के वेतनवाढ मागे घेण्यात आली. त्यांनाही पुरेसे वेतन देता येईल का, यासाठी त्यांना पुढाकार घ्यावा लागेल.
कामगार संघटना एकत्र येऊन ग्रॅज्युएटीमधील बदल, पेन्शन योजनेतील त्रुटी दूर करणे, 595 कंत्राटी कामगारांना संस्थान आस्थापनेवर घेऊन कायम कामगारांच्या सवलती देणे, अशा मागण्या करीत आहेत.
उत्पन्नाचे मार्ग बंद झालेले असताना, कामगार संघटनांच्या मागण्या मार्गी लावायच्या आहेत. राज्य सरकारने मंदिर सुरू करण्यास परवानगी दिली,
तर कोविड रोखण्यासाठी काय ऍक्शन प्लॅन तयार केला, याची माहिती कामगारांनाही नाही. यासर्वांबाबत मंदिर प्रशासन काय भूमिका घेणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved