अज्ञात वाहनाच्या धडकेत दोनवर्षीय नर जातीचे तरस जागीच ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तरस नामक प्राण्याचा वावर वाढू लागल्याच्या घटना ऐकण्यात आल्या आहेत.

या प्राण्याकडून काही जणांवर हल्ला झाल्याच्या घटना देखील घडल्या होत्या. दरम्यान एका तरसाच्या पिल्लाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षीय नर जातीचे तरस जागीच ठार झाले आहे.

सदर घटना मंगळवारी (ता.27) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, खंदरमाळवाडी शिवारातील माहुली येथे महामार्ग ओलंडत असताना त्याच दरम्यान भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात वाहनाची धडक तरसाला बसली.

यामध्ये ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी वन विभागाला दिली. माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी मृत तरसाला कोठे बुद्रुक रोपवाटिकेमध्ये आणून अंत्यसंस्कार केले.

यापूर्वीही असे अपघात अनेकदा घडले आहेत. यामुळे वनविभागाने वन्यजीव वाचविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe