अबब! ‘ह्या’ तालुक्यात एक दिवशी 73 कोरोना रुग्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला.

त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे उपचाराला मर्यादा येत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात काल नव्याने 73 जण करोनाबाधित आढळून आले. श्रीरामपूर तालुक्यात 2196 रुग्ण संख्या झाली आहे. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे.

काल रॅपीड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांत वॉर्ड नं. एक-8, श्रीरामपूर-3, बेलापूर 1, मांडवे 2, कान्हेगाव 1, खंडाळा 7, दत्तनगर 3, हरेगाव 1 तर गोंडेगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

सध्या 48 रुग्ण श्रीरामपुरात रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आठ जणांना अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 4887 जणांची अँटीजेन चाचणी करण्यात आली असून यात आतापर्यंत 2196 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागररिकानी 13 ते 20 सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊनचा जसा निर्णय घेतला आणि त्याला शहरातील सर्व व्यापार्‍यांनी पाठिंबा दिला.

त्याचप्रमाणे सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास श्रीरामपुरात मोठे कोव्हिड सेंटर आपण उभारू शकतो, असा विश्वास नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी व्यक्त केला होता.

फक्त सूचना केल्या म्हणजे आपले काम संपले, असे न करता सर्वांनी मिळून जबाबदारी घेतली तर शहरवासियांसाठी मोठे सुसज्ज कोव्हिड सेंटर सर्वांच्या मदतीने आपण उभारू शकतो, असेही त्या म्हणाल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe