अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- अवैध धंद्यांवर पोलिसांची आक्रमक कारवाईचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा, पानमसाला, तंबाखू जन्य मालावर पोलिसांकडून धाड टाकण्याचे काम सुरु आहे.
पुन्हा एकदा जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे लाखभर रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे सुमारे पाऊण कोटींचा गुटखा पकडल्याचे प्रकरण ताजे असतानाच
शहरातील वार्ड 2 मध्ये जवळपास एक लाखाचा गुटखा काल शहर पोलिसांनी पकडला, यामध्ये दोघाजणांना अटक केली असून एक जण पसार आहे.
पोलिसांनी अश्पाक हबीब पठाण वय-42 राहणार -सुभेदार वस्ती वार्ड नं-2 , सरफराज मुस्ताक मेमन वय -28 वर्षे राहणार -सुभेदार वस्ती वॉर्ड नं-2 या दोघांना अटक केली आहे,
तर आयुब पोपटीया राहणार- कुरेशी मोहल्ला वार्ड नं-2 पसार आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील एका रोडवर एक मालवाहतूक टेम्पो अवैधरित्या गुटखा /पान मसाला व सुगंधी तंबाखूसह मिळून आला.
त्यामध्ये असलेला 84,528/- रुपयांचा पानमसाला व तंबाखू व त्याची अवैधरीत्या वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेली वाहन व मोबाईल असा एकूण 4,05,028/- रुपयांचे मुद्देमालासह मिळून आले आहे.
याप्रकरणी शहर पोलिसात हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील तपास करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved