कौतुकास्पद! या तालुक्यातील तब्बल एवढी गावे कोरोनापासून दूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- देशभरात कोरोनानें कहर केला असून कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. मात्र आजही संगमेनर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.

संगमनेर शहर व आश्वी बुद्रूक या गावापासून संगमनेर तालुक्यात सुरु झालेला कोरोना प्रादुर्भाव तालुक्याच्या 172 गावांपैकी आजपर्यंत 133 गावात पोचला आहे.

तर या महामारीच्या संकटातून तब्बल 39 गावे सुटली आहे. दरम्यान ही टक्केवारी सुमारे 78 टक्के आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत रविवारी 26 रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या 2 हजार 664 वर पोचली आहे.

विविध प्रकारच्या खरेदीसाठी तालुक्याच्या छोट्या मोठ्या गावातून शहरात आलेल्या ग्रामस्थांकरवी कोरोना गावागावात पोचला असल्याने,

सुमारे 172 गावांचा विस्तार असलेल्या संगमनेर तालुक्यातील 133 गावे रविवारी रात्रीपर्यंत कोरोना बाधीत झाली होती. सुरवातीला आक्रमक भुमिका घेतलेले प्रशासनही काहीसे बेबस झाले आहे.

त्यातच मुंबई, पुणे, नाशिक सारख्या महानगरांतील औद्योगिक वसाहतीत नोकरी करणारे तालुक्यातील अनेक जण परस्पर आपल्या गावातील घरी परतल्याने ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढल्याचा अंदाज आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment