सुजय विखे भाजपात आले आणि खासदार झाले, लवकरच केंद्रात मंत्री देखील होतील !

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- आपण मला भाजपात आणल्याने खासदार तर झालो, पण घरातील जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि संभाव्य उपमुख्यमंत्रीपद गेले.उद्या मी मंत्री होईपर्यंत तुम्ही भाजपात राहणार की नाही,

असा थेट सवाल खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी विचारल्यानंतर‘तसा तर तुमचाही भरोसा नाही. मी गेलोच तर तुम्हाला घेऊन जाईल’ असे उत्तर माजी आमदार शिवाजी कर्डिलें यांनी भरसभेत खा.विखेना दिले आहे. 

Ahmednagar Big News MP Sujay Vikhe will soon become a Minister at the Center!

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील कार्यक्रमात विखे-कर्डिले जोडी एकत्र आली होती. एकमेकांना खिंडीत गाठत चिमटे घेण्याची संधी दोघांनीही सोडली नाही.

विखेंचा भाजप प्रवेश आणि खासदारकीचे श्रेय पुन्हा एकदा घेत माजी आमदार कर्डिले म्हणाले, मी जेे बोलतो ते करून दाखवतो.

मिरी गावातच सुजय विखे भाजपात आले तर खासदार होतील,असा विश्वास मी व्यक्त केला होता. यानंतर ते भाजपात आले आणि खासदार झाले. लवकरच ते केंद्रात मंत्री देखील होतील.

खा.विखे यांनी ‘पण तोपर्यंत तुम्ही भाजपात राहणार ना?’ असा चिमटा काढला. त्यावर कर्डिले म्हणाले, ‘जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे राहायचं. पण मला तुमचापण भरोसा वाटत नाही. त्यामुळे जाताना तुम्हालाही सोबत घेऊन जाईल.

त्यांच्या या उत्तराने कार्यक्रमाला जमलेले भाजप नेते आणि पदाधिकार्‍यांच्याही भुवया उंचावल्या. खा.विखेंनी आपल्या भाषणातून या विषयावर अधिक भाष्य केले.

ते म्हणाले, मी जरी भाजपमध्ये येऊन खासदार झालो. मात्र त्यानंतर आईचे जिल्हा परिषद अध्यक्षपद गेले व वडिलांचे संभाव्य उपमुख्यमंत्रीपदही हुकले.

यावेळी दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीकाकेली. पंधरा दिवसात अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची मदत जमा न झाल्यास

भाजपच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा कर्डिले यांनी दिला. यावेळी भाजपच्या आजी-माजी आमदारांसह पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe