अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून दोन महिने दोन वेगवेगळ्या लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
पारनेर तालुक्यातील या तरुणीने याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून सुपा पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या माहितीवरून त्या तरुणाविरुध्द भा.दं.वि. कलम 376, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दिलेल्या फिर्यादीत पीडित तरुणीने म्हटले आहे की, वाडेगव्हाण येथील एका तरुणाने मला लग्नाचे आमिष दाखवून 20 जुलै ते 15 सप्टेंबर या कालावधीत देवदैठण ता. श्रीगोंदा येथील सुप्रीम लॉज व सरदवाडी ता. शिरूर जि. पुणे येथील एका लॉजवर ठेवून माझ्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले.
याबाबत कोणास काही सांगितले तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुझ्या मुलांना सांभाळणार नाही व तुझी समाजात बदनामी करील, असा दम देत रहायचा, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved