अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खूनप्रकरणातील आरोपीस अवघ्या बारा तासांत अटक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून निर्घृण खून करण्याची घटना काल सकाळी नगर शहरातील निंबळक बायपास परिसरात घडली होती.दरम्यान अवघ्या बारा तासांत या गुन्हयातील आरोपीस अटक करण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनला यश आले आहे.

निंबळक बायपास लामखेडे पंपाजवळ रामदास बन्सी पंडीत वय 50 रा.निंबळक ता.जि.अहमदनगर यांचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राने गळयावर वार करुन

पुरावा नष्ट होण्याचे उददेशाने त्यांचेजवळील मोटारसायकल व मोबाईल घेवुन पसार झाला होता. ह्या घटनेनंतर मयताचा मुलगा अशोक रामदास पंडित यांनी

पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरुन एमआयडीसी पो.स्टे.गुरनं .971 / 2020 भादविक 302,201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवुन घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अहमदनगर, उप विभागिय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देवुन तपासाबाबत सुचना दिल्या

त्यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे त्या प्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक एम एम बोरसे , पोहेकॉ लाळगे , पोना नाकाडे , पोना पांढरकर , पोना चव्हाण ,

पोना आंधळे , पोना उगलमुगले , पोना दाताळ , पोना शाबीर शेख , पोकॉ वंजारी , मोबाईल सेलचे अंमलदार प्रशांत राठोड व नितीन शिंदे यांनी अतिशय बारकाईने व कसुन तपास करुन, सदर गुन्हा हा विशाल माणिक घायमुक्ते रा शाहुनगर ,

केडगाव अहमदनगर यांने केला असल्याचे निष्पन्न करुन त्यास ताब्यात घेवुन सदर गुन्हयात अटक केले आहे, अटक आरोपी याने सदर गुन्हा केल्याचे कबुली दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment