अहमदनगर ब्रेकिंग : गर्लफ्रेंडचा खून करणाऱ्या बॉयफ्रेंडला झाली ‘अशी’ शिक्षा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- प्रेम प्रकरणातून अनेकदा काहींच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते तर काहींचे आयुष्य होत्याचे नव्हते होऊन जाते. प्रेम प्रकरणातून अनेकदा घातपात झाल्याच्या देखील अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

अशीच एक घटना जिल्ह्यात घडली होती. या घटनेचा आज निकाल घोषित करण्यात आला आहे. बॉयफ्रेंडने आपल्याच गर्लफ्रेंडचा निर्घृण खून केल्याप्रकरणी

आरोपी प्रदीप माणिक कणसे (वय- 24 रा. तळणी ता. रेणापूर जि. लातूर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी दोषी धरून आजन्म कारावास व 500 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी कणसे याने 27 मे 2016 रोजी मोहिनी तानाजी सुर्यवंशी (रा. हडगा ता. निलंगा जि. लातूर) हिच्यावर कोयत्याने वार करून तिची हत्या केली होती.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत घडलेली घटना अशी कि, शहरातील बुरूडगाव रोडवर राहत असलेली मयत तरुणीला आरोपी प्रदीप कणसे लग्न करण्यासाठी त्रास देत होता.

27 मे रोजी प्रदीपने कोयता सोबत घेऊन पीडित मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला. यावेळी मोहिनीने त्याला नकार दिला. त्याने जवळ असलेल्या कोयत्याने मोहिनीवर वार करून तिचा जीव घेतला.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रदीप कणसे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्यासमोर सुरू होता.

न्यायाधीश आणेकर यांनी आरोपीला आजन्म करावास व 500 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. सतिष पाटील यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी बांदल व काशिद यांनी सहकार्य केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News