अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड वेगात, 24 तासांत वाढले तब्बल ‘इतके’ रुग्ण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस चिंतेत भर टाकू लागली आहे. फेब्रुवारीपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 1617 रुग्ण वाढले आहेत. 

गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत – 

गेल्या चोवीस तासांत जिल्हा रुग्णालयानुसार 458, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 619 आणि रॅपिड चाचणीमध्ये 540 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

  • अहमदनगर शहर 491,
  • राहाता 190
  • संगमनेर 98,
  • श्रीरामपूर 105,
  • नेवासे 51,
  • नगर तालुका 98,
  • पाथर्डी 52,
  • अकाेले 39,
  • काेपरगाव 77,
  • कर्जत 97,
  • पारनेर 31,
  • राहुरी 126,
  • भिंगार शहर 61,
  • शेवगाव 27,
  • जामखेड 08,
  • श्रीगाेंदे 45,
  • इतर जिल्ह्यातील 20,
  • इतर राज्यातील 01 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे

लॉकडाऊन लागलं तर त्याचा आर्थिक फटका :- राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून अहमदनगर जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या संख्येमुळे लॉकडाऊन लागण्याची भीती सर्वसामान्यांना पडली आहे. कारण लॉकडाऊन लागलं तर त्याचा आर्थिक फटका सगळ्यांनाच सहन करावा लागणार आहे.

देशात 24 तासात९३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण – देशात कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड वाढला असून, देशभरात मागील २४ तासांत ९३ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, नव्या वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.देशभरात २४ तासांत ९३ हजार २४९ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

पाचशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू :-  देशात २४ तासांच्या कालावधीत पाचशेहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांतील करोना रुग्णसंख्येचा आणि लसीकरणाची माहिती प्रसिद्ध केली आहे. तर ५१३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज लॉकडाऊनचा निर्णय होणार :- राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजता ही बैठक होणार असून सर्व मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित असतील. 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe