अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून खुलेआम सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यसायावर आज सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली आहे.
या छाप्यात १ पुरुष व २महिलांना त्याठिकाणाहुन ताब्यात घेतले असून श्रीगोंदा शहराजवळील श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील फूट रस्ता परिसरात एका महिलेच्या घरी हा वेश्यावसाय सुरु होता.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी आज सायंकाळी छापा टाकून या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चा पर्दाफाश केला आहे
ज्या महिलेच्या घरी हे सेक्स रॅकेट सुरू होते तिच्यासह त्याठिकाणी सापडलेल्या ग्राहक असलेल्या पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved