अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डोक्यात दगड घालून एकाचा खून

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-नगर शहरात काल भरदिवसा ६.३० च्या सुमारास एका इसमाचा डोक्यात दगड घालून मारुन खून करण्याचा खळबळजनक प्रकार घडला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी आरोपी रमेश (पिंटू) देवदान हिवाळे, वय ३३, रा. रामवाडी, नगर या तरुणास अटक केली आहे.

याप्रकरणी प्रविण रामदास प्रभुणे, वय ३०, धंदा रिक्षाचालक, रा. बोल्हेगाव या तरुणाच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश पिंटू देवदान हिवाळे याच्याविरुद्ध तोफखाना पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रविण प्रभुणे याने फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी रमेश हिवाळे याने फिर्यादीचे वडील रामदास तुकाराम प्रभुणे यांना कामाच्या निमित्ताने घेवून जावून शहरातील तारकपूर बसस्थानकाच्या मागील मोकळ्या मैदानात भिंतीलगत नेले.

तेथे आरोपी रमेश हिवाळे याने रामदास प्रभुणे यांच्या डोक्यात दगडाने मारुन अज्ञात कारणावरुन त्यांना जिवे ठार मारले. घटनास्थळी डिवायएसपी ढुमे, पोनि मुलाणी यांनी भेट दिली. पोसई धायवट हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe