अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील २१ वर्ष वयाच्या तरुण विद्यार्थिनीस आरोपी रोशन हेमंत शिंदे, रा. ब्राम्हणगल्ली , रा : दत्त मंदिरासमोर भिंगार या तरुणाने विद्यार्थिनीला तू माझ्या सोबत चल नाहीतर मी तुझ्या भावाला जिवे मारील, स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करील, अशी धमकी दिली.
विद्यार्थिनीने रोशन शिंदे याच्या धमकीला प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्याने त्याच्याजवळील बाटलीत आणलेले रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेतले व पेटून घेतो, असे म्हटला.
तेव्हा भिंगार परिसरात राहणारी ही विद्यार्थिनी घाबरली व ती भितीपोटी रोशन शिंदे याच्याबरोबर गेली. रोशन शिंदेने विद्यार्थिनीला थेट गुलबर्गा येथे त्याच्या मावशीच्या घरी नेले.
तेथे त्याने वेळोवेळी अनेकवेळा विद्यार्थिनीच्या इच्छेविरुद्ध मावशीच्या घरातच बलात्कार केला. हा प्रकार ३० सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान घडला.
पिडीत विद्यार्थिनीने काल याप्रकरणी भिंगार पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी रोशन हेमंत शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शिंडे हे पुढील तपास करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved