अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव गेवराई राज्यमार्गावर मोटारसायकल व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर या वाहनांचा सुकळी येथे झालेल्या अपघातात माध्यमिक शिक्षक अश्रिनाथ बापूराव जरे जबर जखमी झाले
त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने शेवगावला हलविले मात्र उपचार सुरू असतानाच निधन झाले हा अपघात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील सुकळी येथे रस्त्याने मोटारसायकलवर जाणार्या अश्रिनाथ जरे व ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचा जबर अपघात होवून गोळेगाव येथील भगवान विद्यालयातील शिक्षक जरे हे बोधेगावकडे घरी येत असताना झालेल्या विचित्र अपघातात जबर जखमी झाले.
ही घटना गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. अपघातानंतर बराच वेळ ते जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना पुढील उपचारासाठी शेवगावला तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना निधन झाले. ऐन दिपावलीच्या धामधुमीत घटना घडल्याने बोधेगाव गोळेगाव भागात शोककळा पसरली.
शुक्रवारी रात्री उशिरा शेवगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ऊस वाहतूक करणार्या बैलटायर गाडी व ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागच्या बाजूने रिफ्लेक्टर लावले जात नसल्याने रात्री वाहनाचा अंदाज येत नाही. तसेच हि वाहने मोठ्या आकाराचे साऊंड लावतात. यामुळे अनेकदा अपघात घडतात. यामुळे अशा वाहनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करू लागले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved