अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ९५ रुग्ण वाढले वाचा आजचे सविस्तर अपडेट्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.४३ टक्के इतके झाले आहे.

 दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५६६ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४९, पाथर्डी १७, नगर ग्रामीण ०५, कॅंटोन्मेंट ०१,  नेवासा ०१, राहुरी १८, शेवगाव ०२, जामखेड ०१ आणि कर्जत ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५६७ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १७७, संगमनेर १६, राहाता ५४, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३८, श्रीरामपूर ३१, 

कॅंटोन्मेंट १७,  नेवासा ४३, श्रीगोंदा ३४, पारनेर २३, अकोले २०, राहुरी २६, शेवगाव ४६,  कोपरगाव ०५, जामखेड १०, कर्जत ०८, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: २३२४१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:३५६६
  • मृत्यू:३९७
  • एकूण रूग्ण संख्या:२७२०४

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment