अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या थोडीफार का होईना कमी झाली आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण वाढत होते ते आज काही प्रमाणात खाली आले आहेत.
गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 1998 रुग्ण वाढले आहेत. तसेच नगर शहरातही गेल्या आठवडाभर पाचशेच्या पटीत रुग्ण वाढत होते ते जवळपास दोनशे ने कमी होत फक्त 382 पर्यंत पोहोचले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले आहेत –
अहमदनगर शहर 382, राहाता 124, संगमनेर 111, श्रीरामपूर 127, नेवासे 82, नगर तालुका 150, पाथर्डी 134, अकाेले 82, काेपरगाव 63, कर्जत 222, पारनेर 86,
राहुरी 128, भिंगार शहर 19, शेवगाव 105, जामखेड 73, श्रीगाेंदे 86, इतर जिल्ह्यातील 21, इतर राज्यातील 02 आणि मिलिटरी हॉस्पिटल 01 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
जिल्हा रुग्णालयानुसार 657, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 337 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1004 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|