अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात सर्वात मोठा रेकॉर्ड ! एकाच दिवसांत 3 हजार…..

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचा रेकोर्ड ब्रेक असा आकडा वाढला आहे, चोवीस तासांत नगर जिल्ह्यात तब्बल 3097 रुग्ण वाढले आहेत.

गेल्या 24 तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत – जिल्हा रुग्णालयानुसार 871, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 829 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1397 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

आजवरची सर्वाधिक रुग्णसंख्या :- नगरमधील 675 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ राहातामध्ये तीनशे आणि संगमनेरमध्या दाेनशेच्या पुढे आकडा गेला आहे.

अहमदनगर शहर 675, राहाता 352, संगमनेर 267, श्रीरामपूर 165, नेवासे 134, नगर तालुका 169, पाथर्डी 195, अकाेले 147, काेपरगाव 177, कर्जत 190, पारनेर 133,

राहुरी 107, भिंगार शहर 46, शेवगाव 114, जामखेड 79, श्रीगाेंदे 107, इतर जिल्ह्यातील 27, इतर राज्य 03 आणि मिलिटरी हॉस्पिटल 10 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe