अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘येवढे’ कोरोनाचे रुग्ण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार २२४ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२६७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ०९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८, आणि अँटीजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, पाथर्डी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०४, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, राहुरी ०२, संगमनेर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अकोले १८, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण १२, पारनेर ०२, पाथर्डी ०५,

राहता ०४, संगमनेर ०७, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०४, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, अकोले १०,

जामखेड ०४, कर्जत ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रा.४१, नेवासा १०, पारनेर ०२, पाथर्डी २०, राहुरी ०१, शेवगाव ०७, श्रीगोंदा ०८, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५७२२४

उपचार सुरू असलेले रूग्ण: १२६७

मृत्यू:८९९

एकूण रूग्ण संख्या:५९३९०

 

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment