कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने पार केला 35 हजरांचा आकडा, वाचा गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल एक हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. 

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.१० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६९७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४७०७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१० आणि अँटीजेन चाचणीत ३५३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६८,  संगमनेर ०३, राहाता ०१, पाथर्डी ०३, श्रीरामपूर ०९, नेवासा ०४, श्रीगोंदा ०५, पारनेर ०४, अकोले ०७, राहुरी १७, कोपरगाव ०१, कर्जत ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २१० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५७, संगमनेर १०, राहाता ३७, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १६, श्रीरामपुर १०, कॅंटोन्मेंट ०३,  नेवासा ०९, श्रीगोंदा ०६, पारनेर १३, अकोले ०३, राहुरी ३५, शेवगाव ०५, कोपरगाव ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३५३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा १९, संगमनेर १८, राहाता ३७, पाथर्डी २७, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर २०,  कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ५५,  श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले ४५, राहुरी ०२, शेवगाव ३२, कोपरगाव २९, जामखेड १८ आणि कर्जत १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एक हजार ५१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २३५, संगमनेर ६६, राहाता १४२, पाथर्डी २९, नगर ग्रा ५५, श्रीरामपूर ७६, कॅन्टोन्मेंट ११, नेवासा ६७, श्रीगोंदा ३२, पारनेर ६२, अकोले ४७, राहुरी ८१, शेवगाव ३६, कोपरगाव ३७, जामखेड ३०, कर्जत ३७, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ३०१३६
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:४७०७
  • मृत्यू:५६९
  • एकूण रूग्ण संख्या:३५४१२

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe