अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- कोरोनाबाधितंच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण पुणे शहर भयभित झाले असताना,याच पुण्यातील पश्चिम भागातील महापालिकेच्या दोन वॉर्डमध्ये कोरोनचा फैलाव मात्र होऊ शकलेला नाही.औंध-बाणेर व कोथरुड-बावधन या दोन वॉर्ड मध्ये मार्चच्या अखेरीस अनुक्रमे दोन व एक असे तीन रुग्ण आढळले होते.
परंतू एक महिन्यांनंतरही येथील परिस्थिती जैसे थे च असुन जे तीन रुग्ण होते त्यापैकी दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत,तर रुग्णालयात उपचार घेणारया तिसरया रुग्णाचा पुनर्तपासणी अहवालही निगेटिव्ह आला आहे.
औंध-बाणेर वॉर्ड येथे परदेशातुन आलेली एक व्यक्ति कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली व काही दिवसांतच त्याच्या पत्नीलाही कोरोनची बाधा झाल्याचे आढळून आले,तर कोथरुडमध्येही लंडनहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने मार्चच्याच शेवटच्या आठवड्यात नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
दरम्यान,शहरातील अन्य भागांत कोरोनचा फैलाव वाढत असताना,सुदैवाने या दोन्ही वॉर्डमध्ये अन्य कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 25 एप्रिल पर्यंत केलेल्या तपासणीत आढळून आले नाही. बाणेर येथे परदेशातुन आलेल्या संबंधीत व्यक्तीमुळे त्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाला होता.यामुळे ते राहत असलेल्या बिल्डींगमधील इतर दोन कुटुंबातील दहा सदस्यंची तपासणी केली ,तर कोथरुड येथील रुग्णांच्या संपर्कातील 16 जणांचीही तपासणी केली.
या सर्व हाय स्टीक व्यक्तिचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याना होम क्वारंटाईन केले. सर्वेक्षण पथकाचे औंध-बाणेर वॉर्डचे प्रमुख डॉ.गणेश आंबादास डमाळे यांनी काम पार पाडले. पुढे त्यांनी सांगितले,”आम्ही फक्त परदेशातुन आलेल्या प्रवाश्यांवरच नाही तर स्थनिक प्रवाश्यांवर सुद्धा प्रत्येक सोसायटीचे अध्यक्ष आणि स्थनिक नेते यांच्या महितीद्वारे बरीक नजर ठेवलेली होती.
कुठल्याही व्यक्तीला जर ताप ,सर्दी ,खोकला असे काही लक्षण दिसले तर लगेच त्यांना फ्लू क्लिनिक ला पाठून त्यांच्या घश्याच्या स्राव तपासणी साठी पाठवण्यात येत होते.होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती 14 दिवसा ऐवजी 28 दिवस ते त्यांच्या देखरेखी खाली ठेवत.दररोज त्यांची तपासणी केली जाई. नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन त्यांना विश्वासात घेउन घरातच राहण्याचा सल्ला आणि प्रशासनाला मदत करण्याची विनंती केली.
सर्व प्रकारचे वैद्यकीय जैविक कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे आदेश कर्मचार्याना देण्यात आले.नागरिकांनी खबरदारी घेतली तर लवकरात लवकर आपण कोरोना वर मात करू शकतो असा विश्वास डॉ.गणेश डमाळे यांनी व्यक्त केला.” वडील पेशाने डॉक्टर आणि डमाळवाडी गावचे प्रथम सरपंच. संपूर्ण पंचक्रोशीतील नामांकीत डॉक्टर.गणेश ला लहान पणा पासूनच वडिलांमुळे डॉक्टर होण्याची खूप इछा.2007 साली वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने सर्व घर कोसळून पाडल्यासारखे झाले
.गणेश त्या वेळेस पुण्याला BAMS च्या दुसरया वर्षाला शिकत होता.एका महिन्यावर बहिणीच लग्न आल होत.घरातील मोठा मुलगा म्हणून आई च्या खंदयाला खांदा देऊन वडिलांची जागाभरुन काढली. अर्धांग वायू झाल्यामुळे वडिलांचे बाहेर फिरणे कमी झाले आणि पेशंट पहाणे सुधा कमी झाले,तरी सुधा परिस्थितीशी दोन हात करत गणेश ने एका वडापाव वर दिवस काढून मिळेल तेवढ्याच पैश्यात आपले B A M S चे शिक्षण पुर्ण केले. 2013 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पदी त्यांची निवड झाली.
2014 मध्ये माझी मंत्री बबनराव ढाकणे यांचे PA श्री.बडे सर यांच्या मुलीशी विवाह झाला.त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी डमाळे या सुधा वैद्यकीय अधिकारी म्हणून पुणे महानगरपालिका मध्ये कार्यरत आहेत.डॉ.गणेश डमाळे यांनी योग्य ती खबरदारी घेऊन योग्य ते नियोजन करुन आपल्या कार्याचा ठसा आज वैद्यकीय क्षेत्रात उमटवलेला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®