Ajanta Caves: तुम्हाला माहिती आहे का अजिंठा लेण्यांचा शोध कसा लागला? कशाप्रकारे अजिंठा लेण्या दृष्टिक्षेपात पडल्या? वाचा माहिती

Ajay Patil
Published:

Ajanta Caves:- भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि त्यामधील अनेक पर्यटन स्थळे हे काही हजारो वर्षापासून अस्तित्वात आहेत. तसेच जर आपण जगाच्या पाठीवर असलेल्या हडप्पा आणि मोहेंजोदारो या संस्कृतींचा विचार केला तर या उत्खननामध्ये सापडलेले आहेत.

पर्यटन स्थळांच्या दृष्टिकोनातून जर आपण महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्याला अनेक प्रकारच्या ऐतिहासिक परंपरा असून मोठ्या प्रमाणावर गड किल्ल्यांसारखे ऐतिहासिक समृद्ध असलेली पर्यटन स्थळे देखील आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात देशाचे सांस्कृतिक वैभव असलेल्या वेरूळ आणि अजिंठा लेणी आहेत.

ही दोन्ही पर्यटन स्थळे जागतिक कीर्तीचे असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर देशातीलच नव्हे तर विदेशी पर्यटक देखील भेट देतात. यामधील जर आपण अजिंठा लेण्यांचा शोध कसा लागला किंवा कोणी लावला? या मागची कहाणी बघितली तर ती खूपच रोचक आहे.

 ब्रिटिश सैन्य अधिकारी जॉन स्मिथ याने लावला अजिंठा लेण्यांचा शोध

आपल्याला माहित आहे की,अजिंठा लेणी हा एक अनमोल असा ऐतिहासिक वारसा असून इंग्रज सैन्यातील अधिकारी असलेले जॉन स्मिथ यांच्यामुळे 28 एप्रिल 1819 रोजी हा वारसा जगासमोर आला. अजंठा लेणी जगासमोर येण्याला जवळपास 205 वर्ष कालच पूर्ण झाले. याबाबतची कहाणी बघितली तर 28 एप्रिल 1819 मध्ये मद्रास रेजिमेंट चा कॅप्टन असलेले जॉन स्मिथ हे सुट्ट्यांमध्ये अजिंठा जंगलामध्ये आले.

या ठिकाणी आल्यानंतर ते काही दिवस तिथे राहिले व कालावधीमध्ये ते या परिसरातील असलेल्या जंगलांमध्ये शिकारीसाठी जायचे. असेच एक दिवस ते शिकारीसाठी सैनिकांसह वाघुर नदीच्या लेणापुर जवळ असलेल्या टेकडीवर पोचल्यावर तिथे एक लहान मुलगा म्हशी चारताना त्यांना दिसला. त्या मुलाने जॉन यांना सांगितले की साहेब मी तुम्हाला वाघाचे घर दाखवतो.  हा मुलगा इशाऱ्याने काहीतरी दाखवतो याची जाणीव कॅप्टन जॉन यांना झाली.

त्यामुळे हा मुलगा नेमके काय दाखवतो आहे हे पाहण्यासाठी कॅप्टन वाघूर नदीच्या कोरड्या पात्रामध्ये उतरले. जॉन यांना वाटले की हा मुलगा या ठिकाणी कोणतातरी प्राणी राहत असतील ती जागा दाखवत आहे व त्यामुळे ते बंदुकीच्या ट्रिगरवर बोट ठेवूनच सावधगिरीने त्या झूडपातील गुहेच्या दिशेने गेले.

यामध्ये गुहेच्या दिशेने जात असताना जॉन यांची नजर गुहेत असलेल्या एका नक्षीदार खांबावर पडली. तो खांब पाहत असताना जॉन गुहेच्या दिशेने पुढे सरकले व गुहेमध्ये शिरले. गुहेमध्ये शिरल्यानंतर मात्र या गुहेमध्ये बरेच अर्धवट रंगीत चित्रे जॉन यांना दिसून आली.

ही सगळी चित्रे मातीने गाडली गेलेली होती व जॉन यांची नजर वरच्या बाजूला गेल्यानंतर वरती देखील नक्षीदार खांब बघून त्यांना आश्चर्य वाटले. हे सगळे पाहून जॉन यांना कळून चुकले की आपल्याकडून काहीतरी विलक्षण असा शोध लागला आहे याबाबत त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले.

ही घटना घडली तो दिवस होता 28 एप्रिल 1819 होय व याच दिवशी अजिंठा लेणी जगासमोर आल्या.आज अजिंठा लेणी देशाचे सांस्कृतिक वैभव असून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत तसेच कलेचा अद्भुत अविष्कार संपूर्ण जगाला भुरळ घालणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe