अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-राज्यात आठ महिन्यापासून लाॅकडाऊन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. कोरोनासह आपणाला जगावे लागणार आहे.
लोकांनी शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटाझरचा नियमितपणे वापर आवश्यक आहे. यापुढे लाॅकडाऊनचे नाव काढू नये, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पवार म्हणाले, गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फार बिकट झाली आहे. दररोज काम केले तरच त्यांचे घरदार चालते.
सततच्या लाॅकडाऊनचा फटका सर्वसामान्य आणि गरीब लोकांनाच बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या-ज्या वेळी लाॅकडाऊन घोषित केले तेव्हा हा आदेश सर्वांनी पाळला आहे.
वारकरी संप्रदाय समंजस असून काही महाराज मंडळींनी वेगळी भूमिका घेतली होती तरीही त्यांच्या भूमिकेस राज्यातील वारकऱ्यांनी पाठिंबा दिला नाही.
कोरोनामुळे केंद्र व राज्यात कर जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल तर कारवाई करावी लागेल, अशी तंबी पवारांनी या वेळी दिली
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved