अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कर्जत पंचायत समितीच्या सभापती यांच्या गाडीला शुक्रवार (दि. १६ ऑक्टोबर) रोजी सायंकाळच्या सुमारास अपघात झाला.
दरम्यान समजलेल्या माहितीनुसार सुदैवाने या गाडीत सभापती अश्विनी कानगुडे या उपस्थित नव्हत्या. या अपघातात कार चालक तात्या जाधव हे किरकोळ जखमी झाले आहेत.

याच गाडीतील पत्रकार विजय सोनवणे हे सुखरूप असल्याची माहिती सभापती अश्विनी कानगुडे यांनी दिली. अपघाताबाबत माहिती अशी कि, ड्रायव्हर गाडी चालवत असताना अचानक गाडीला गाय आडवी आली.
यामुळे गरबडलेल्या ड्रायव्हरकडून गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी दोनदा पलटी होऊन रस्त्याच्या खाली जावून कोसळली. मात्र सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या गाडीच्या जोरदार धडकेमुळे गाय दगावली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved