…आणि निष्ठा पावली,बाळासाहेब थोरातांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद !

संगमनेर :- काँग्रेसचे निष्ठावान नेते व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी काल  महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा अविस्मरणीय भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच संगमनेर तालुक्यामध्ये फटाक्यांची अतिषबाजी झाली. 

आमदार थोरात यांनी अडचणीच्या काळामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना काँग्रेसला महाराष्ट्रात सन्मानपूर्वक जागा मिळवून देत महाविकास आघाडी स्थापन होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

पक्षनेतृत्वाने त्यांच्या वर सातत्याने मोठा विश्वास टाकला असून आमदार बाळासाहेब थोरात यांनीही या विश्वासाला पात्र काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिले आहे.

दरम्यान  बाळसाहेब थोरात यांच्या शपथविधी नंतर संगमनेर तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला. 

Entertainment News Updates 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment