कासार यांच्या अर्ज माघारीनंतर राहुरीच्या नगराध्यक्षपदी अनिता पोपळघट बिनविरोध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-  जनसेवा आघाडीचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक अनिल कासार यांनी नगराध्यक्षपदासाठीचा भरलेला अर्ज माघारी घेतल्याने नगरध्यक्षपदी अनिता पोपळघट यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुरीच्या नगराध्यक्षपदी जनसेवा आघाडीच्या विद्यमान नगरसेविका सौ. अनिताताई दशरथ पोपळघट यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली.

काल (शुक्रवार) दुपारी दोन वाजता प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सौ. अनिताताई पोपळघट यांची बिनविरोध निवड त्यांनी जाहीर केली.

मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे यांनी त्यांना मदत केली. ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, अरुण तनपुरे, डॉ.उषाताई तनपुरे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व सर्व नगरसेवकांनी जो विश्वास दाखवून नगराध्यक्षपदाची संधी दिली

त्या संधीतून शहराला जास्तीत जास्त सोयीसुविधा व प्रगतिपथावर नेण्याचे काम करेल, असा विश्वास निवडीनंतर सौ. पोपळघट यांनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment