त्या बहुचर्चित सेक्स रॅकेटमधील अजून एक जण ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे सुखसोयीनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल लॉजऐवजी घरगुती वेश्याव्यवसायच सुरक्षित वाटू लागल्याने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या समोर येत आहे.

यातच श्रीगोंदा शहरातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड करून हे रॅकेट चालवणारी एक महिला आणि एक दलाल पुरुष या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर या प्रकरणाचे तपास अधिकारी पो नि जाधव यांनी अटक केलेल्या श्रीगोंदयातील देवकर नावाच्या दलालाकडे सखोल चौकशी केली असता

त्याने दौंड येथील प्रकाश धनाजी बांगळे हा दलाल आपल्याला वेश्या व्यवसायासाठी मुली व महिला पुरवत असल्याचे पोलिसांना सांगितले.

त्यास न्यायालयासमोर हजर केले असता १९ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे .दौंड येथील सदर दलाल हा सेक्स रॅकेटमधला फार मोठा दलाल असून तो पुणे येथील तसेच परप्रांतीय महिला,

मुली यांना वेश्याव्यवसायासाठी आणून दौंड मध्ये देखील मोठं सेक्स रॅकेट चालवत होता. परंतु दौंड पोलिसांच्या नजरेतून तो वाचत होता श्रीगोंदा पोलिसांनी मात्र त्याला जेरबंद केला आहे

तसेच श्रीगोंदा येथील दलाल देवकर आणि सदर महिला आरोपी यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपली असता देवकर याला पुन्हा पोलीस कोठडी तर महिला आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment