Apang Karj Yojana:- समाजातील विविध घटकांकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना असून या योजनांच्या माध्यमातून प्रामुख्याने समाजातील त्या त्या घटकांना उद्योग व्यवसाय उभारणी करिता आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून अशा उद्योग व्यवसाय उभारणीतून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी व जीवनमान उंचवावे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे.
याच दृष्टिकोनातून जर आपण समाजातील अपंग म्हणजेच दिव्यांग असलेल्या व्यक्तीचा विचार केला तर त्यांना बऱ्याचदा कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहावे लागते. अपंगत्वामुळे त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. परंतु आता अशा अपंग व्यक्तींना देखील शासनाच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी बीज भांडवल देण्यात येणार आहे
व या मदतीने असे अपंग बेरोजगार युवक देखील आता त्यांचा उद्योग व्यवसाय उभारून आर्थिक दृष्ट्या स्वतः स्वावलंबी होऊ शकणार आहेत. याच दृष्टिकोनातून नेमकी ही योजना काय आहे? त्याबद्दलचेच महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
दिव्यांगांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळेल बीज भांडवल
जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुम्ही स्वतः दिव्यांग किंवा तुमचे मित्र दिव्यांग असतील तर आता शासनाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारण्याकरिता बीज भांडवल मिळणार आहे. या आधारे अशा प्रकारच्या बेरोजगार युवक त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करता येणे शक्य होणार.
ज्या दिव्यांग बंधूंना आर्थिक कारणामुळे व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असून देखील तो सुरू करता येत नाही अशांसाठी ही शासकीय योजना खूप फायद्याची ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना बीज भांडवल म्हणून कर्ज देण्यात येणार आहे. दिव्यांग बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय, एखादा उद्योग किंवा शेतीपूरक व्यवसाय दिव्यांग बंधूंना करता येणार आहे.
कोणत्या प्रकारातील व्यक्तींना या योजनेचा मिळेल लाभ?
या योजनेचा लाभ प्रामुख्याने कर्णबधिर, अंधव्यक्ती, अल्पदृष्टी, अस्थीव्यंग असलेले व्यक्ती व मतिमंद इत्यादी दिव्यांग प्रकारातील व्यक्तींना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
काय आहेत या योजनेच्या अटी?
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
2- या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे सादर करणे गरजेचे आहे.
3- संबंधित अर्जदाराची अपंगत्वाची टक्केवारी 40% पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
4- तसेच अर्जदाराचे उत्पन्न आहे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
5- अर्जदाराचे वय हे 18 ते 50 या वयोगटातील असणे गरजेचे आहे.
किती मिळणार अनुदान?
अपंग बीज भांडवल योजनेच्या अंतर्गत व्यवसायाच्या एकूण प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के किंवा कमाल 30000 पर्यंतचा लाभ या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे व हा लाभ अनुदान बीज भांडवल स्वरूपामध्ये दिला जातो व उर्वरित रक्कम म्हणजेच 80 टक्के भाग हा कर्जाच्या स्वरूपात अर्जदाराला दिला जातो.
या योजनेकरिता कुठे कराल अर्ज?
जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी त्यांच्याकडे अर्ज करू शकतात.
किती मिळते अनुदान?
यांतर्गत उद्योग व्यवसाय करण्याकरिता प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के किंवा कमाल 30000 रुपये इतके कर्ज मिळते.