अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायदेवतेचे दरवाजे देखील बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान मिशन बिगेन अंतर्गत राज्यातील अनेक सेवा पूर्वरत झाल्या आहे.
त्याच पार्शवभूमीवर न्यायालयाने आपली नियमावली जारी केली आहे. उच्च न्यायालयाने लागू केलेल्या सुधारित नियमावली नुसार सोमवार, आजपासून (दि.२१) जिल्हा व तालुका ठिकाणच्या न्यायालयांचे नियमित कामकाज सुरू झाले आहे.

न्यायालयातील सुनावणीचे कामकाज सकाळी साडेदहा ते दीड व दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच अशा दोन सत्रात होणार आहे.
ज्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे, त्या दिवशी त्याच संबंधित वकील व पक्षकारांना न्यायालयीन इमारतीत प्रवेश दिला जाणार आहे
नगर जिल्हा न्यायालयाच्या कामकाजाच्या नियोजनासाठी नुकतीच प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांच्या उपस्थितीत वकील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह महत्वाची बैठक झाली आहे,
अशी माहिती शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड.भूषण बऱ्हाटे यांनी दिली. यावेळी सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे व न्यायिक अधिकारी उपस्थित होते.
वकिलांना कामकाजात अडचण होवू नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लॉयर्स सोसायटीचेही कामकाज नियमावलीचे पालन करून सुरू केले जाणार आहे.
ज्येष्ठ वकिलांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या कडील प्रकरणांच्या सुनावणीत लेखी म्हणणे सादर करण्यास प्राधान्य द्यावे, असा पर्याय सुचवण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved