अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोना संकटात जीवाची बाजी लावून घरोघरी सर्व्हेक्षण करणाऱ्या, कोणत्याही परिस्थितीची तमा न बाळगता आपले काम तत्परतेने करणाऱ्या आशा स्वयंसेविका या खऱ्याअर्थाने ‘देवदूतच’आहे.
गावपातळीवर आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य सेविका (आशा) यांची गावागावात नेमणूक केली. या आशा सेविका म्हणजे गावच्या चालता बोलता सरकारी दवाखानाच असतात.

आशा सेविकांचे हे कौतुकास्पद काम पाहून राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पाटील हे भारावून गेले. गडाख पाटलांनी या आशा सेविकांचे कामाचे कौतुक केल्याने या ‘आशा’ सेविकांना एक सुखद धक्का बसला.
नेवासे तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ व कोरोना पार्श्वभूमीवर मंत्री गडाख हे तालुक्याचा दौरा करून गावोगावी जनतेशी संवाद साधत आहेत.
मंत्री गडाख हे म्हाळस पिंपळगाव (ता. नेवासे) दौऱ्यावर असतांना त्यांना गावात कोरोना सर्व्हेक्षणाचे काम करणाऱ्या दोन आशा सेविका दिसल्या. गडाख यांनी या सेविकांशी संवाद साधला.
गडाख यांनी या सेविकांना सर्वप्रथम कोरोना पार्श्वभूमीवर स्वतःची आणि परिवाराची काळजी घेण्याचा सल्ला दिला. ‘आशा’चें या महामारीच्या काळात व एरवीही जनतेसाठी देत असलेले योगदान मोठे व कौतुकास्पद असल्याचे मंत्री गडाख यावेळी म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved