आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या या महामारीत कोरोना योध्याबरोबरच आशा सेविका देखील सहभागी होऊन गावपातळीवर काम करत आहे.

मात्र कामाच्या तुलनेत त्यांना दिला जाणार मोबदला ऐकला तर तुम्हाला देखील नवलच वाटेल. कोरोना सर्व्हेचा पुरेसा मोबदला न देता

आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये व आशा गट प्रवर्तकांना प्रतिदिन 16 रुपयात राबवून घेतले जात आहे. कोरोना महामारीपासून संरक्षणाची कोणतीही पुरेशी साधने न देता महिला कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे राबवून घेणे थांबवा.

स्थानिक विकास निधितून कोरोना सर्वेसाठी आशांना प्रतिमहिना किमान 3000 रुपये व आशा गट प्रवर्तकांना किमान 5000 रुपये अतिरिक्त मानधन द्या अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

अकोले तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांनी या बाबतचे निवेदन अकोले तहसीलदार मुकेश कांबळे यांना दिले.

ग्रामपंचायत व नगरपालिकास्तरावर उपलब्ध असलेल्या स्थानिक विकास निधीतून महिन्याला 3000 रुपये कोरोना सर्वेसाठी तरतूद करणे अजिबात अवघड काम नाही.

कोरोना सर्वेसाठी अशाप्रकारची तरतूद करायला तयार नसतील तर आशा सुद्धा आपला व आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकून केवळ 33 रुपयात सर्वे करायला तयार नाहीत.

पुढील आठ दिवसात निर्णय न झाल्यास कोरोना सर्वेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा सिटू संलग्न जनशक्ती आशा कर्मचारी संघटनेने दिला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment