आशालता वाबगावकर यांची भंडारदऱ्याला भेट देण्यासह अहमदनगरच्या बाबतीत ‘ही’ इच्छाही राहिली अपूर्णच

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 सप्टेंबर 2020 :- जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर अतिशय मृदू व हळव्या स्वभावाच्या होत्या. परंतु त्या तितक्याच स्पष्टवक्त्याही होत्या.

आशाताई संगमनेर येथे काही दिवसांपूर्वी रंगकर्मी संगमनेर संस्थेने आयोजित केलेल्या अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

मुंबई-घोटीमार्गे त्या अकोले येथे आल्या होत्या. तसेच ५ वर्षांपूर्वी अहमदनगर येथे आयोजित स्व. शाहीर दादा कोंडके चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नगरी सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२, २३, २४ मे २०१५ रोजी येथील महेश चित्रमंदिर येथे आयोजित दादा कोंडके चित्रपट महोत्सव, एकपात्री अभिनय स्पर्धा,

विविध लोककला स्पर्धा तसेच नृत्य, गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमांना आशालता वाबगावकर यांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली होती.

या भेटीत निर्माते अतुल ओहोळ यांनी आशालता यांना शनिशिंगणापूर व श्री क्षेत्र शिर्डी साईबाबांचे दर्शनही घडविले होते. २५ मे रोजी त्या मुंबईकडे रवाना झाल्या होत्या.

आणि जातांना मी पुन्हा नगरला येईल अशी इच्छा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. तसेच संगमनेरच्या भेटीवेळी त्यांनी ‘येथील सुंदर निसर्ग आहे. मला भंडारदार येथे निसर्गरम्य वातावरणात काही क्षण घालवायचे आहेत.

अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. पुढील वर्षी पावसाळ्यात नक्की भंडारदरा निसर्ग परिसराला आपण भेटू देऊ’, असे ठरवले देखील होते.

परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन बंद असल्यामुळे हे शक्य होऊ शकले नाही. त्यांची ही देखील इच्छा अपूर्ण राहिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment