सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच ठेवली; फडणवीसांचा आरोप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था आहे, पण मदत द्यायला सरकार तयार नाही.

असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यातच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून राज्यातील महाविकासआघाडी सरकावर निशाणा साधत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलीच टीका केली आहे.

आम्ही शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर, पोलिसांनी जेलभरो आंदोलन करणारे वडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे.

दिवाळीच्या दिवशी या सर्वांना कारागृहातच रहावे लागत असल्यावरून देखील फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यात दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना मदतीविना आपला बळीराजा संकटात आहे.

या सरकारने त्याची दिवाळी अंधारातच ठेवल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. बळीराजा संकटात असताना त्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारकडे मागण्या करण्यात आल्या, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

पण सरकार दाद द्यायलाच तयार नाही. बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपाने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले.

तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe