अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- पारनेर तालुक्याच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार अाहे, असे आमदार नीलेश लंके यांनी रविवारी येथे बोलताना सांगितले. गांजीभोयरे येथे सत्कार व विविध कामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, सभापती प्रशांत गायकवाड, पिंपळगाव जोगा समितीचे मुख्य प्रवर्तक शिंदे, माजी सभापती सुदाम पवार, राहुल झावरे, शैलेश औटी, विजय औटी, जयसिंगराव मापारी,
किसनराव रासकर, बाजार समितीचे संचालक अण्णा बढे, अंकुश गायकवाड, भाऊसाहेब नाना खोडदे, उपसरपंच कुंडलिकराव देंडगे, सुभाष पांढरे आदी उपस्थित होते. प्रा. गंगाराम महाराज खोडदे व श्रीकांत खोडदे यांनी सूत्रसंचालन केले.
उत्तम पांढरे यांनी आभार मानले. पिंपळगाव जोगाचे पाणी गांजीभोयरे, तसेच परिसरातील दहा गावांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन लंकेंनी दिले.