भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार.. माजी आमदारांनी केला उघडकीस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- सरकारी कार्यालयात गेले कि आपल्या कामासाठी अधिकाऱ्यांची हाजीहाजी करूनही कामे होत नसल्याच्या अनेकदा आपणास अनुभव आला असेल.

अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांचा सुरु असलेला मनमानी कारभार याबाबत खुद्द माजी आमदार वैभव पिचड यांनी पोलखोल केली आहे.

माजी आमदार पिचड यांनी भूमी अभिलेख कार्यालयात भेट देऊन अधिकारी यांचेशी भूमी अभिलेख कार्यालयाच्या अडचणी समजून घेण्यासाठी व जनतेची कामे प्रलंबित असण्या मागची कारणे समजून घेतली.

अकोले तालुक्यातील १९० गावासाठी भूमी अभिलेख कार्यालयात मोजणी करीता एकच मशीन व कर्मचारीही कमी आहेत. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे मागणीच केली नाही,

असा अकोले येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार माजी आमदार वैभवराव पिचड यांनी उघड केला. समस्यांचा पाढा वरिष्ठांपर्यंत पोहचतच नाही तर

जनतेचे प्रश्न तरी कसे सुटणार असा सवाल माजी आमदार पिचड यांनी केला. भूमी अभिलेख कार्यालयात अनेक कामे प्रलंबित पडली.

राजूर येथील आवारी (वय ८५) या दीड महिन्यापासून चकरा मारूनही त्यांना चलन मिळाले नाही, असा या कार्यालयाचा गलथान कारभार सुरु आहे.

अधिकाऱ्यांच्या केबिनला काच बसवा नाहीतर दरवाजे उघडे ठेवा अधिकारी केबिनमध्ये दरवाजा बंद करून बसतात. त्यामुळे जनतेची अनेकवेळा अधिकारी आहे की नाही याबाबत फसगत होते.

म्हणून माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अधिकारी यांना दरवाजा उघडा ठेवून केबिनमध्ये बसा किंवा दरवाजाला काच बसवून घ्या, म्हणजे अधिकारी केबिनमध्ये असल्याचे व काय करीत आहे. हेही जनतेला समजेल अशी विनंती केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment