मोठी बातमी ! CBSE 10वी आणि 12वीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-  विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा 4 मेपासून सुरू होणार आहेत.

10 जून 2021 पर्यंत या परीक्षा सुरू राहतील. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी 2 फेब्रुवारीला दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येतील असं सांगितलं होत.

त्यानुसार आज वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा या मार्चमध्ये घेण्यात येतील.त्या वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येतील असंही सांगण्यात आलं आहे.

cbse.gov.in या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी अशा दोन पर्यायापैकी एका पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिसू शकेल. ती माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्येही डाऊनलोड करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News